Song Details: Kadu Limbala Aala Kasa God Pala Lyrics.

Kadu Limbala Aala Kasa God Pala Lyrics

|| कडुलिंबाला आला कसा गोड पाला
झालो दंग मी पाहुनिया साईलीला ||

पावन साईचं हे गुरूस्थान
वाणी थकेल गाता गुणगान
पावन बाबाचं हे गुरूस्थान
वारीत केलं गाता गुणगान

रिता ना कुणीभी इथं न गेला
झालो दंग मी पाहुनिया साईलीला

मूर्ती सामोरी ह्या साई मंदिरी
झोळी सुखानं माझी भरते सारी
साईनाथ धावतोया हाकेला
झालो दंग मी पाहुनिया साईलीला

द्वारकामाई माझी आई
लेकरा परी मजला बिलगून घेई
कुशीत घेइतिया बाळाला
झालो दंग मी पाहुनिया साईलीला

कडुलिंबाला आला कसा गोड पाला
झालो दंग मी पाहुनिया साईलीला

This is the end of the lyrics.